पैठण: मराठवाड्यातील-लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले.मराठवाड्यात अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरले होते .या मध्ये कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे.मात्र या मातब्बर नेत्यांची चर्चा होण्या ऐवजी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले शिवसेना भाजपा युतीचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या राजकीय भवितव्यांचीच जास्त चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ही चर्चा पैठण तालुक्यातील मतदार करताना दिसत आहे.वास्तविक पाहता पैठण तालुक्यातील मतदार हे जालना लोकसभा मतदारसंघात जोडण्यात आलेले आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून खा.रावसाहेब दानवे व विजय औताडे यांनी निवडणूक लढवली आहे असे असताना पैठण तालुक्यातील मतदार हे औरंगाबाद मतदार संघातील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या बाबतीत चर्चा करताना दिसत आहे. खा.चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिवसेनेतुन हकालपट्टी करण्यात आलेले आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते तसेच वंचित आघाडीचे उमेदवार आमदार जलील, कॉग्रसआघाडीने आमदार सुभाष झांबड, यांना निवडणूक रिंगणात उतरवले.खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात तिन तिन आमदार निवडणूक रिंगणात उतरले असल्याने चंद्रकांत खैरे निवडूण येतील का नाही? या चिंतेने पैठण तालुक्यातील जनता ग्रासलेली दिसत आहे आता 23 मेकडे पैठण करांचे लक्ष लागले आहे.